पिंपरी-चिंचवड
दिघीत ओबीसी संघर्ष समितीची स्थापना
भोसरी, ता. १४ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसीलाच प्रतिनिधित्व मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी दिघी परिसरातील ओबीसी समाजातील नागरिकांनी ओबीसी संघर्ष समितीची स्थापना केली.
यावेळी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या बैठकीत ओबीसी जोड अभियान दिघी बोपखेल प्रभागात प्रभावीपणे राबवणे, ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी ठोस लढा उभारणे, बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणे, शैक्षणिक व नोकरीतील संधी मधील कुठलेही बदल होऊ नये म्हणून शासनावर दबाव आणणे, अन्यायकारक निर्णयांविरोधात आंदोलन उभारणे आधी विषयावर चर्चा करण्यात आली. हक्क, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व टिकवण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.