इच्छुक उमेदवार समाज माध्यमांवर सक्रिय

इच्छुक उमेदवार समाज माध्यमांवर सक्रिय

Published on

भोसरी, ता. ८ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागल्यावर प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवार सरसावले आहेत. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी ते वेगवेगळ्या ‘आयडिया’ त्यांच्याद्वारे लढविल्या जात आहेत. तर समाज माध्यमावरही हे इच्छुक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. या इच्छुकांच्या विविध पोस्ट ‘व्हॉट्स ॲप’वर येत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक २०२२ ला होणे अपेक्षित होते. मात्र, ती होऊ शकली नाही. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर ही निवडणूक होऊ घातलेली आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह नव उमेदवारांद्वारे निवडणुकीत उभे राहण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांसह इतरही राजकीय पक्षांचे तिकीट मिळवण्यासाठीची चाचपणी सुरू आहे.
मतदारांपर्यंत पोचण्यासाठी इच्छुकांकडून ‘खेळ रंगला पैठणीचा’, मोफत आरोग्य तपासणी शिबिर यासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी इच्छुकांद्वारे समाज माध्यमांचाही मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे. सर्व सण-उत्सव, संत आणि नेत्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा, पुण्यतिथीला अभिवादनासह प्रभागातील नागरिकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट त्यांच्या फोटोसह समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहेत. यासह नागरिकांना फायदेशीर असणाऱ्या काही पोस्टही टाकण्यात येत आहेत. यामध्ये नव मतदार नोंदणी, मतदान कार्डातील दुरुस्त्या, विविध शासकीय योजनांची माहिती आदिंचा समावेश आहे. त्यामुळे मतदारांचे भ्रमणध्वनी या पोस्टमुळे सतत वाजताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे आपली पोस्ट इतरांपेक्षा आकर्षक कशी असेल याकडेही उमेदवारांद्वारे लक्ष दिले जात आहे.

निवडणुकीमुळे सुटत आहेत समस्या
काही माजी नगरसेवकांद्वारे नागरिकांचा ग्रुप तयार करून प्रभागातील समस्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. समस्या सुटल्यानंतर समस्येचा जुना फोटो आणि समस्या सुटल्यानंतरचा फोटो समाज माध्यमावर टाकले जात आहेत. निवडणुकीमुळे समस्या सुटल्याचे समाधानही नागरिकांना मिळत आहे.

नेत्यांचे फोटो गायब
काही इच्छुक उमेदवारांद्वारे विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे फोटो पोस्टमध्ये टाकण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे त्या पक्षांकडून तिकीटांसाठीही प्रयत्न होताना दिसत आहेत. मात्र, तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अशा इच्छुकांची अडचणही होताना दिसत आहे. काहीजण नाईलाजास्तव नेत्यांचे फोटो ठेवत आहेत, तर काहीजणांद्वारे पोस्टमधून नेत्यांचे फोटो गायब केले जात आहेत.

भावी नगरसेवकांचे पीक
काही इच्छुक उमेदवारांद्वारांद्वारे ‘भावी नगरसेवक’ अशा पोस्टही त्यांच्यसह कार्यकर्त्यांद्वारे टाकण्यात येत आहेत. त्यामुळे समाज माध्यमावर ‘भावी नगरसेवकांचे पीक’ आल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे किती भावी नगरसेवक प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जातील, हे पाहण्याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com