भारतीय संविधान जगात सर्वोत्तम

भारतीय संविधान जगात सर्वोत्तम
Published on

भोसरी, ता. १३ : ‘‘आपले संविधान हे जगातील सर्वोत्तम आदर्शांच्या मूल्यांनी भरलेले आहे. आदर्श लोकप्रतिनिधी कसे असावेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कारभारातून कळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य डोळ्यांसमोर ठेवून त्यातून प्रेरणा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श संविधान निर्माण केले,’’ मत व्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांनी भोसरीत व्यक्त केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीद्वारे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘स्वराज्य ते संविधान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक सखाराम डोळस होते. या वेळी दादू डोळस, दीपक डोळस, विलास डोळस, दिनकर डोळस, राजेंद्र डोळस, अमोल डोळस, सुनील डोळस आदि उपस्थित होते.

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५८ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी डॉ. योगेश गाडेकर आणि डॉ. पूजा गाडेकर यांनी केली. कार्यक्रमाचे नियोजन जयंती महोत्सव समितीच्या महिलाध्यक्ष नूतन डोळस, आनंद डोळस, अमित डोळस, प्रशांत जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश डोळस, सूत्रसंचालन सुशील डोळस यांनी केले. आभार मुकेश डोळस यांनी मानले.भ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com