देहूतील शिळा मंदिरासाठी चांदीच्या पादुका अर्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूतील शिळा मंदिरासाठी
चांदीच्या पादुका अर्पण
देहूतील शिळा मंदिरासाठी चांदीच्या पादुका अर्पण

देहूतील शिळा मंदिरासाठी चांदीच्या पादुका अर्पण

sakal_logo
By

चाकण, ता. २४ : जगद्‍गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरासाठी येलवाडी, खालुंब्रे (ता. खेड )येथील अधिक उद्योग समूहाचे प्रमुख, उद्योजक विजय सदाशिवराव बोत्रे परिवाराच्या वतीने शिळा मंदिरासाठी पाच लाख रुपयांच्या चांदीच्या पादुका मोरारी बापू यांच्या हस्ते विधीपूर्वक अर्पण करण्यात आल्या.
संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने नुकताच जीर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात झाला होता. पायी वारीची अखंड परंपरा असणाऱ्या श्रीक्षेत्र येलवाडी (ता. खेड ) येथील अधिक उद्योग समूहाचे प्रमुख विजय सदाशिवराव बोत्रे परिवाराच्या वतीने या शिळा मंदिरासाठी पाच लाख रुपयांच्या चांदीच्या पादुका मोरारी बापू यांच्या हस्ते विधिपूर्वक अर्पण करण्यात आल्या. या सोहळ्यासाठी अभिमत डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, माजी आमदार विलास लांडे, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, अजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, शिवाजी महाराज मोरे, संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, देवस्थानचे माजी अध्यक्ष प्रल्हाद मोरे, येलवाडीचे सरपंच रणजित गाडे, उद्योजक शंकर बोत्रे, कैलास मोरे व उद्योजक विजय सदाशिवराव बोत्रे व परिवाराचे सदस्य उपस्थित होते.


श्री क्षेत्र देहू ः येथील शिळा मंदिरासाठी पाच लाखांच्या चांदीच्या पादुका उद्योजक विजय सदाशिवराव बोत्रे परिवाराच्या वतीने मोरारी बापू यांच्या हस्ते विधिवत अर्पण करण्यात आल्या.