उद्यानांबाहेरील फळांच्या रसाला फिरायला येणाऱ्यांची पसंती
चिंचवड स्टेशन, ता. १० ः शाहूनगर, पूर्णानगर तसेच संभाजीनगरच्या उद्यानांबाहेर फळभाज्यांचे रस विक्री करणारे विक्रेते दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांत या स्टॉलची संख्या वाढू लागली आहे. मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंगला येणाऱ्या लोकांचा ज्यूस पिण्याकडे कल वाढू लागला आहे. नागरिक व्यायामाला आयुर्वेदाची जोड देताना दिसत आहे.
या परिसरात शाहू उद्यान, फुले शाहू आंबेडकर उद्यान, अटलबिहारी वाजपेयी उद्यान अशी अनेक मोठी उद्याने आहेत. येथे सकाळच्या हवेत फेरफटका मारायला येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. प्रत्येक ठिकाणी फिरायला येणारी लोक आवर्जून एक ग्लास फळांचा रस घेताना दिसतात.
कडुनिंब, कारले, आवळा, तुळस, पुदिना, आले, गाजर, बीट, बेल, गव्हांकुर, दुधी भोपळा अशा अनेक फळभाज्यांचे रस स्टॉलवर उपलब्ध असतात. मधुमेह, संधिवात, दमा, अशक्तपणा, पित्त, मूळव्याध, अपचन, वजन कमी करणे अशा वेगवेगळ्या आजारांवर मात करण्यासाठी वेगवेगळे रस असतात. यातून बरेच फायदे झाल्याचे लोक सांगतात. वेगवेगळ्या आजारांवर आवश्यक तो रस पिल्याने नक्की फायदा होतो आणि काही दिवसातच फरक जाणवू लागतो असे विक्रेते सांगतात.
हे विक्रेते रोज सायंकाळी मंडईतून फळभाज्या आणतात. रात्री त्या कापून घेतात. पहाटेच्या वेळेस त्याचा मिक्सरमधून ज्यूस काढून हवाबंद डब्यात ठेवून विक्रीसाठी येतात. प्रत्येक ग्राहकाच्या मागणीनुसार त्याला काय उपयुक्त आहे असा ज्यूस बनवून देतात. काही ठिकाणी एका ग्लासची किंमत 15, तर काही ठिकाणी 20 ते 25 रुपये इतकी आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे आणि फास्टफूडमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायामाबरोबरच फळभाज्यांचा रस लोक घेऊ लागले आहेत.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

