सांडपाणी वाहिनीलगत धोकादायक खड्डा

सांडपाणी वाहिनीलगत धोकादायक खड्डा

Published on

चिंचवड, ता. १ : केशवनगर वसाहत येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर सांडपाणी चेंबरलगत मोठा खड्डा पडल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून रोज अनेक वाहनधारक जात असतात. त्यामध्ये दुचाकीस्वार आणि सायकलस्वारांची संख्या अधिक आहे.
खड्डा थेट रस्त्याच्या मधोमध असून, रात्रीच्या वेळी किंवा पावसात हा खड्डा स्पष्ट दिसत नाही. तेथे गाडी अथवा सायकल आदळून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः शाळकरी मुले व वृद्ध नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी तातडीने दुरुस्ती न झाल्यास रात्रीच्या वेळी खड्ड्यात नागरिकांचा पाय अडकून पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या खड्ड्याची तत्काळ दखल घेऊन दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com