चिंचवड काळभोरनगर विठ्ठल–रुक्मिणी मंदिरामध्ये कीर्तन सप्ताहाची भक्तिमय सांगता...
चिंचवड, ता.१९ ः काळभोरनगर येथील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात सुरू झालेल्या कीर्तन-प्रवचन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात समारोप झाला. या सप्ताहात नामवंत कीर्तनकारांनी सुश्राव्य कीर्तनातून वारकरी भाविकांना आध्यात्मिक आनंद दिला.
गोपालकाल्यानिमित्त कीर्तन सप्ताहाची गणेश महाराज साळुंखे (कराड) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
याप्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त ॲड.रोहिणी पवार, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे विश्वस्त माणिक महाराज मोरे-इनामदार, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
समारोपानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शेकडो वारकरी, भाविकांनी कीर्तन सप्ताहात सहभागी होत हरिकीर्तनाचा आस्वाद घेतला.
शंकर काळभोर आणि सोमनाथ काळभोर यांनी केले आयोजन केले. हनुमान भजनी मंडळ, आकुर्डी तसेच समस्त काळभोर परिवार यांनी यशस्वीरीत्या नियोजन पार पाडले.
CWD25A01837