इंदिरानगर, दळवीनगरमध्ये पाणी टंचाई सदृश्य स्थिती

इंदिरानगर, दळवीनगरमध्ये पाणी टंचाई सदृश्य स्थिती

Published on

चिंचवड, ता.१५ ः गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून इंदिरानगर व दळवीनगर परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, काही भागांमध्ये पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
काही भागांमध्ये पुरेशा दाबाने पाणी येत असताना इंदिरानगर, दळवीनगर येथे मात्र अर्धा तास पाणी येत आहे. चिंचवडमधील विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वी अडचणी येत असत. त्यामुळे २५ दशलक्ष लिटर क्षमतेची मोठी पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. मात्र, त्याच भागांत कमी दाबाने पाणी मिळत आहे. परिणामी, दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून नागरिकांना पिण्याचे, स्वयंपाकाचे तसेच घरगुती वापरासाठी पाणी साठविण्यात अडचणी येत आहेत. अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. टाकीजवळ असूनही आम्हाला पाणी मिळत नाही, हे अत्यंत अन्यायकारक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

या परिसरामध्ये आम्ही गेल्या २० वर्षांपासून राहत आहोत. महापालिकेच्या नळाचे पाणी तिसऱ्या मजल्यावर चढत होते. परंतु आता पहिल्या मजल्यावर पाणी येणे अवघड झाले आहे. सध्या गेल्या १५ दिवसांपासून पाणी वर चढत नाही. पाणी खूप कमी दाबाने येत असल्यामुळे आम्हाला पाण्याचा साठा करण्यासाठी अडचणी येत आहेत.
- आप्पा शिंदे, स्थानिक रहिवासी

परिसरातील लोकांसाठी जवळच लाखो लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. परंतु जवळच्या भागांत आम्हाला कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे पाण्याचा साठा करणे देखील अवघड बनले आहे. यावर्षी खूप पाऊस पडून सुद्धा पाणीटंचाई का ? असा प्रश्न आम्हाला पडत आहे.
- अनिल गावडे, स्थानिक रहिवासी

इंदिरानगर, दळवीनगर परिसरात वरुनच पाणीपुरवठा कमी झाल्याने पाणीटंचाईसारखी स्थिती होती. परंतु सध्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू आहे. जेथे कमी दाबाने पाणी येते. तेथे प्रत्यक्षात पाहणी केली जाईल. व्यवस्थित पाणीपुरवठा केला जाईल.
शरद मोरमारे, उपअभियंता पाणीपुरवठा, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय


CWD25A02270

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com