पिंपरी-चिंचवड
महावीर चौक चिंचवड स्थानक मार्गावरील सेवा रस्ता खड्डेमय
चिंचवड, ता. ७ ः महावीर चौक ते चिंचवड स्थानक दरम्यानच्या सेवा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सतत वाहतूक असलेल्या या मार्गावरील दुरवस्था अपघातांना आमंत्रण देत आहे. दुचाकीस्वारांचा तोल जाऊन घसरून पडण्याच्या घटना देखील वाढल्या असून, लहान मुले व महिलांसह प्रवास करणाऱ्यांना अधिक धोका निर्माण झाला आहे. पावसाळा संपूनही रस्ता दुरुस्त न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. खड्डे चुकविताना मागून येणाऱ्या वाहनांचा धोका अधिक जाणवतो, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तत्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त न केल्यास अपघातांची संख्या वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

