‘नो पार्किंग’चा फलकच वाहनांच्या गराड्यात
चिंचवड, ता. १६ : पिंपरी चिंचवड वाहतूक उपायुक्त कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर ‘नो पार्किंग’ फलक आहे. तरीही, वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे अन्य वाहनांसाठी रस्ता अपुरा पडून कोंडी होत आहे. तर, अनेक वाहनांनी धडक दिल्यामुळे हे फलकदेखील वाकले आहेत.
या परिसरात मोरया बस स्थानक, शाळा, शॉपिंग मॉल, दुकाने आहेत. त्यामुळे परिसरात शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे पीएमपीएमएल बस या मार्गावरून वळण घेताना मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहने पार्क केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. बसस्थानक असूनही मुख्य रस्त्यावर अनधिकृतरित्या बेकायदेशीर उभ्या केलेल्या चारचाकी कारमुळे बससाठी जागा मिळत नाही. परिणामी, सर्व बसेसना एस. के. कंपनी रोडवर दोन्ही बाजूला उभे करावे लागते. गर्दीच्या वेळी बसचालकांना वाहन वळवताना कसरत करावी लागत असून प्रवाशांनाही याचा फटका बसतो. पोलिस उपायुक्त कार्यालय या परिसरात असतानाही रस्त्यावर होत असलेल्या नियमभंगाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसते. नो पार्किंगमधील वाहने, वाकलेले फलक, कोंडी पाहता वाहतूक विभाग व महापालिकेने समन्वय साधून तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

