मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
चिंचवड, ता. १२ ः मोरया गोसावी समाधी मंदिर उत्सव २०२५निमित्त संपूर्ण परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. उत्सवात पथारी व्यवसाय तसेच महाप्रसाद कार्यक्रमामुळे निर्माण होणाऱ्या प्लास्टिक, द्रोण, कंटेनर व चहाचे कप अशा भरपूर कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
या अभियानात जेएसपीएम राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे येथील १०० विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग होता. तसेच टीम ईसीए, पिंपरी चिंचवड हिंदू खाटीक चॅरिटेबल ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभाग (ब प्रभाग) यांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वी झाले.
ईसीएचे ट्रस्टी निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, टीम लीडर सिकंदर घोडके, तानाजी भोसले, संगीता घोडके, अनिल दोडामणी, कल्पना तळेकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत मुथियान, रमेश कटारिया यांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. पिंपरी चिंचवड हिंदू खाटीक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ थोरपे, कुमुदनी थोरपे, चंद्रकांत थोरात, लता थोरात, सुरेश थोरात यांनीही योगदान दिले.
सायन्स पार्कच्या संचालिका श्रद्धा खामप्रिया, नंदकुमार सारस व संध्या करमरकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. सिकंदर घोडके यांनी प्लास्टिक वापर टाळण्याचे आवाहन केले. बाजारात किंवा मटण, मासे घेताना कापडी पिशवी व घरचा डबा वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. डिवाइन संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छतेची शपथ तसेच कचरा वर्गीकरणावर पथनाट्य सादर करून जनजागृती केली.
हॉटेल रिव्हर व्ह्यू घाट ते धनेश्वर पूल आणि दशक्रिया विधी घाट व संपूर्ण देऊळमळा परिसरात स्वच्छता करण्यात आली. प्रा. बी. बी. गाडेकर, प्रा. डॉ. अमोल पाटील, प्रा. डॉ. भारती महाजन, प्रा. डॉ. जया नेहते व प्राध्यापक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवत हा उपक्रम खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरीत्या पूर्ण केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

