घंटागाडी ठराविक वेळी येत नसल्याने गैरसोय
चिंचवड, ता. १७ ः दळवीनगर,भोईरनगर व इंदिरानगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घंटागाडी निश्चित वेळी येत नाही. कचरा संकलनाची ठराविक वेळ नसल्यामुळे विशेषतः महिला व नोकरदार त्रस्त झाले आहेत. घंटागाडी कधी सकाळी सात वाजता, कधी दुपारी बारा वाजता जेवणाच्या वेळी, तर कधी थेट सायंकाळी चार वाजता येत असल्याने कचरा टाकायचा कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कधी उंच, तर कधी कमी उंचीची गाडी येत असल्याने महिलांना कचरा टाकताना अडचणी येतात. उंच गाडीत कचरा टाकताना तो अंगावर किंवा रस्त्यावर पडतो. त्यामुळे अस्वच्छता वाढत आहे. कचरागाडीची उंची कमी ठेवावी, व एकसारखीच व लहान गाडी नियमित पाठवावी, अशी महिलांची मागणी आहे.
घंटागाडी वेळेवर न आल्यामुळे अनेक ठिकाणी रात्री-अपरात्री कचरा उघड्यावर टाकला जातो. परिणामी दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कधी-कधी वर्गीकरण न करता सर्व कचरा एकत्रच टाकला जातो. गाडी पुरेसा वेळ थांबत नसल्याने महिलांना धावत जाऊन कचरा टाकावा लागतो.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन घंटागाडीचे नियमित वेळापत्रक ठरवावे. सकाळ व सायंकाळी दोन वेळा कचरा संकलन करावे आणि स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---
घंटा गाडी रोज एकच येत नाही. गाड्या बदलतात. त्या उंच असल्यामुळे आम्हाला कचरा आतमध्ये टाकता येत नाही. परिणामी कचरा अंगावर किंवा जमिनीवर पडतो. यासंबंधी मी बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना सांगितले असूनही परिस्थिती तशीच आहे. गाडीची उंची कमी करावी जेणेकरून आम्हाला व्यवस्थित कचरा टाकता येईल.
- अश्विनी कदम
---
घंटागाडीची वेळ निश्चित नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. कधी जेवत असताना दुपारी घंटा गाडी येते. त्यामुळे कचरा टाकणार कधी, हा प्रश्न पडतो. ही गाडी जागेवर न थांबविता पुढे पुढे पळविली जाते.त्यामुळे आम्हाला कचरा टाकताना खूप त्रास होतो.
- प्रीती शेलार
---
सध्या नवीन गाड्या दिलेल्या आहेत. आमचे सकाळीच बोलणे झाले आहे. गाड्यांची उंची कमी करण्याबद्दल तसेच गाडी वेळेवर येण्या संदर्भात गुरुवारी बैठक घेऊन वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. जुनी गाडी नादुरुस्त असेल तेव्हा अशा अडचणी येतात. बैठकीत गाडीसंदर्भात निर्णय होईल. कचरा टाकताना महिलांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
- रूपाली साळवे, आरोग्य निरीक्षक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

