चिंचवडला श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्सव सुरू
चिंचवड, ता.२ ः श्री गजानन सत्संग मंडळाच्यावतीने आयोजित संत श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगटदिन उत्सवाला कलश पूजन व नगर प्रदक्षिणा सोहळ्याने दिमाखदार प्रारंभ झाला. रविवारी (ता.८) प्रगट दिन उत्सवाचा मुख्य कार्यक्रम होणार असून त्याची सुरुवात सकाळपासूनच धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात झाली.
सकाळी ५.३० वाजता श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीला उष्णोदक अभिषेक व अभ्यंग स्नान घालण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजन करून भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७ वाजता कलश पूजनाने उत्सवाची औपचारिक सुरुवात झाली. दुपारी ३.३० वाजता अत्यंत नयनरम्य अशा फुलांनी सजविलेल्या श्रींच्या शाही पालखीचे नगर प्रदक्षिणेसाठी प्रस्थान झाले. गजानन महाराज मंदिरापासून झुंजार युवक मंडळ गणपती - शिवाजी उदय मंडळ - काकडे पार्क - केशवनगर - धनेश्वर मंदिर व श्री मोरया गोसावी समाधी मंदिर - चिंचवडचा राजा गणपती मंदिर मार्गे - पॉवर हौस चौक - बस थांबा - कालिकामाता मंदिर - लिंक रोडमार्गे पुन्हा गजानन महाराज मंदिर असा पालखीचा मार्ग राहिला. सुरुवातीला बँड पथक, त्यानंतर भजनी मंडळ, रास रंगला ग्रुपच्या मंदिरातील महिला सेवेकरी भगिनी, डोक्यावर तुळशी घेतलेल्या महिला भक्त आणि अखेरीस श्रींची शाही पालखी असा भव्य व शिस्तबद्ध क्रम पाहायला मिळाला. हा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी भक्तांची मोठी गर्दी जमली होती. प्रसाद वाटपाने हा भक्तिरसपूर्ण सोहळा संपन्न झाला. श्री गजानन सत्संग मंडळाचे सचिव प्रताप भगत, उपाध्यक्ष किशोर कदम यांच्यासह सर्वांनी सोहळा आणि भाविकांचे स्वागत केले.
साईबाबा पालखीची भेट
पालखी मार्गावर भक्तांकडून महाराजांच्या प्रतिमेचे औक्षण करण्यात आले. फुलांची उधळण करण्यात आली. काकडे पार्क येथे संत श्री साईबाबा व संत श्री गजानन महाराज यांच्या पालख्यांची भेट हा विशेष भावनिक क्षण ठरला. यावेळी दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. काकडे पार्क चौकात रास रंगला ग्रुपतर्फे महिलांच्या फुगड्या, तर भजनी मंडळाकडून पावली व फुगडीचे सादरीकरण करण्यात आले. धनेश्वर मंदिर, मोरया गणपती मंदिरात पालखी दर्शनासाठी नेण्यात आली. मोरया गोसावी मंदिरात मुख्य विश्वस्त श्री मंदार देव महाराज यांनी पालखीचे स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

