देहूत मतदानाची 
जय्यत तयारी

देहूत मतदानाची जय्यत तयारी

देहू, ता. ११: लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी देहू नगरपंचायतीच्या वतीने मतदान केंद्राबाहेर मंडप घालण्यात आला. मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी देहू नगरपंचायत हद्दीतील १८ हजार ९७५ मतदार मतदान करणार आहेत. मतदानासाठी २० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. माळवाडी आणि देहूतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदान केंद्र आहेत.
तलाठी सूर्यकांत काळे म्हणाले, ‘‘नगरपंचायतीच्या हद्दीत देहू, माळवाडी आणि विठ्ठलवाडी या तीन गावाचा समावेश होतो. मतदान प्रक्रियेसाठी गावातील जिल्हा परिषदेचे शाळा सज्ज आहेत. १८९७५ मतदार असून वीस मतदान केंद्र आहेत. यात माळवाडीमध्ये ४, देहू आणि विठ्ठलवाडी या दोन्ही गावातील मतदान देहूतील प्राथमिक शाळेत होणार असून येथे १६ मतदार केंद्र आहेत. पुरुष मतदारसंख्या ९८१० असून, ९१६३ महिला मतदार आहेत. तर दोन तृतीयपंथी मतदार आहेत. दररोज ढगाळ वातावरण होत आहे. तसेच ऊन मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर मंडप उभारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com