पिंपरी-चिंचवड
देहू नगरपंचायत स्वीकृत सदस्यपदी मोरे, काळोखे
देहू, ता. १० : नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी योगेश मोरे आणि अमोल काळोखे यांची बिनविरोध निवड झाली. याबाबतची विशेष सभा शुक्रवारी (ता.१०) आयोजित करण्यात आली. हवेलीचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने सभेच्या अध्यक्षस्थानी होते. देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सतरा सदस्य आहेत. त्यामुळे दर सहा महिन्यांनी स्वीकृत सदस्याची निवड केली जाते. दरम्यान, नगरपंचायत कार्यालयात सकाळी अर्ज दाखल करण्यात आले. स्वीकृत सदस्य पदासाठी काळोखे आणि मोरे यांचे अर्ज दाखल झाले. दोनच अर्ज दाखल झालेने प्रांताधिकारी माने यांनी निवड जाहीर केली.