पिंपरी-चिंचवड
कार्तिकी यात्रेपूर्वी देहूत पोलिसांचे संचलन
देहू, ता. ८ : कार्तिकी यात्रेनिमित्त देहूरोड पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवारी (ता. ८) पोलिस संचलन करण्यात आले. यामध्ये पोलिस अधिकारी आणि सुमारे ४० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. येत्या १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या कार्तिकी यात्रेदरम्यान देहूत भाविक मोठ्या संख्येने येतात. यात्रेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर हे संचलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली. संत तुकाराम महाराज देऊळवाडा ते देहूरोड मुख्य कमान या मार्गावर पोलिस संचलन करण्यात आले.
---

