देहू नगरपंचायतीला दोन हेक्टर जमीन उपलब्ध होणार
देहू, ता. ५ : देहू नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारत व अग्निशमन केंद्र या सार्वजनिक सुविधा साठी देहू येथील सरकारी गायरानातील पाच एकर जागा देहू नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पत्र राज्याचे महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी मोहसीन शेख यांनी काढले आहे.
देहू नगरपंचायतीच्या स्थापनेस पाच वर्ष झाले आहे. तसेच देहूतील गायरानात ५९ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. नगरपंचायत प्रशासनाला इमारत बांधणीसाठी जागा आवश्यक होती. या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत प्रशासनाकडून जागा मिळावी यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करण्यात आला होता, याची दखल घेत शासनाने देहू नगरपंचायतीस दोन हेक्टर जागा इमारत व अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी दिली आहे, असे आदेशाचे पत्र नुकतेच नगरपंचायतीला प्राप्त झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

