जागृती महिला ग्रामसंघाचा मेळावा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागृती महिला ग्रामसंघाचा मेळावा उत्साहात
जागृती महिला ग्रामसंघाचा मेळावा उत्साहात

जागृती महिला ग्रामसंघाचा मेळावा उत्साहात

sakal_logo
By

इंदोरी, ता. ३० ः श्री क्षेत्र येलवाडी (ता. खेड) येथे जागृती महिला ग्रामसंघाच्यावतीने महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास सुमारे दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुराधा गाडे होत्या. उमेद अभियानांतर्गत येलवाडी गावातील ३० महिला बचतगटांची जागृती महिला ग्रामसंघाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांचा विकास व सबलीकरण करण्याचा प्रयत्न वर्षभर केला जातो.
त्यासाठी विविध खाद्यपदार्थ व गृह उद्योग, महिलांचे विविध प्रश्न व समस्या याविषयीचे प्रशिक्षण वर्ग तसेच कार्यशाळांचे आयोजन केले जाते. यासाठी खेड पंचायत समिती व बॅंक ऑफ बडोदाचे मोलाचे सहकार्य असते. असे शाहुबाई गायकवाड व सुजाता गायकवाड यांनी सांगितले. प्रमुख मार्गदर्शक रोहिणी गाडे यांनी महिलांच्या आर्थिक समस्या व त्यावरील उपाय तसेच महिलांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. वर्षभरात थोर विभूतींचे जन्मदिन व स्मृतीदिन साजरे करणे, विविध स्पर्धांचे आयोजन करणे, तसेच भारतीय संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी सण समारंभ साजरे करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक व स्वागत सपना गाडे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता बोत्रे व कौशल्या गायकवाड यांनी केले. नियोजन मंगल गाडे, सुनीता गाडे, दीपाली अवांडकर, पायल तुपे, धनश्री गावडे यांनी केले. तर आभार ज्योती वाघमारे यांनी मानले.