
आधारकार्ड शिबिरात इंदोरीत मोठा प्रतिसाद
इंदोरी, ता. १४ ः येथील माजी आदर्श सरपंच संदीप काशीद यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दोन दिवशीय मोफत आधार कार्ड अपडेट शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे तीनशे नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
संदीप काशीद हे काही ना काही निमित्ताने वर्षभर सेवाभावी उपक्रम राबवीत असतात. त्यांनी स्वखर्चाने नव्याने बांधकाम करून विष्णू तसेच ब्रम्हेश्वर मंदिराचे सभामंडपाचे बांधकाम करून गावाचे वैभवात भर टाकली आहे.
विविध शासकीय योजनांचा लाभ यापुढे ही चालू राहण्यासाठी आधार कार्ड अपडेट करून घेणे गरजेचे असल्याने संदीप काशीद यांनी वाढदिवसानिमित्त मोफत शिबिराचे आयोजन केले. शिबिराचे संयोजन ऋतुराज काशीद, नीलिमा काशीद, सपना चव्हाण, सुरेखा शेवकर यांनी केले. शिबिर उद्घाटन जगन्नाथ शेवकर व दशरथ ढोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी संदीप काशीद, मुकेश शिंदे, संदीप नाटक, विनोद भागवत,संदीप ढोरे उपस्थित होते.