Fri, March 24, 2023

काशिनाथ म्हाळूंगकर यांचे निधन
काशिनाथ म्हाळूंगकर यांचे निधन
Published on : 16 March 2023, 9:57 am
इंदोरी, ता. १६ ः म्हाळुंगे इंगळे (खेड) येथील बॅंक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक काशिनाथ किसन म्हाळूंगकर (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कै. काशिनाथ म्हाळूंगकर यांचे मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. म्हाळूंगकर हे उद्योजक रवींद्र म्हाळूंगकर व मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला ग्रामीण अध्यक्षा पुष्पलता घोजगे यांचे वडील तर माजी सरपंचरमेश घोजगे यांचे सासरे होत. भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार यांचे मावस भाऊ होत.
काशिनाथ म्हाळूंगकर