आंबी येथे जिल्हास्तरीय विषय शिक्षक कार्यशाळा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबी येथे जिल्हास्तरीय 
विषय शिक्षक कार्यशाळा संपन्न
आंबी येथे जिल्हास्तरीय विषय शिक्षक कार्यशाळा संपन्न

आंबी येथे जिल्हास्तरीय विषय शिक्षक कार्यशाळा संपन्न

sakal_logo
By

इंदोरी, ता. ८ ः पुणे जिल्हा परिषद (माध्य. शिक्षण विभाग) व पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी आंबी (मावळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आंबी येथे जिल्हास्तरीय विषय शिक्षक दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेसाठी पुणे जिल्ह्यातून सुमारे २०० माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते. सेवा ज्येष्ठता व मूल्यांकन याबाबत उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी यांनी तर नवीन शैक्षणिक धोरण व प्रश्नपत्रिका आराखडा याविषयी महेंद्र गणपुले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. नंदा भोर, माया कोथळीकर, वर्षा घोरपडे, डॉ. जयश्री अत्रे, डॉ. सुलभा विधाते, डॉ. शिवाजी लिमये व प्रा. सचिन आहेरया तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शालेय विषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्‍घाटन डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या उपकुलगुरू डॉ. सायली गणकर यांच्या हस्ते झाले. तर
अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर होते. तर समारोप
उपशिक्षणाधिकारी सचिन लोखंडे व मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज यांच्या प्रमुख उपस्थितीत
व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रास्ताविक व स्वागत नंदकुमार सागर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रसाद गायकवाड व प्रा. संदीप अवचार यांनी केले. नियोजन प्रा. चेतन मोरे, विठ्ठल माळशिकारे व विकास तारे यांनी केले. आभार भानुदास रिठे यांनी मानले.