मावळाच्या पूर्वपट्ट्यातील बाजरीची काढणी लांबणीवर

मावळाच्या पूर्वपट्ट्यातील बाजरीची काढणी लांबणीवर

इंदोरी, ता. ११ ः मावळात मागील आठवड्यापासून बाजरी काढणी सुरु झाली. परंतु, ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, मावळच्या पूर्व पट्ट्यातील बाजरीची काढणी थांबली आहे.
मावळात विशेष करून पूर्व भागातील तळेगाव, वराळे, इंदोरी, नाणोली, कोटेश्वरवाडी, जांबवडे, सुदवडी, सुदुंबरे, सांगुर्डी, कान्हेवाडी, माळवाडी गावांमध्ये उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले गेले आहे. अवघ्या तीन महिन्यांत येणारे खात्रीशीर व हमखास पीक म्हणून बाजरीकडे बघितले जाते. शिवाय अलीकडे चांगला भाव मिळत असल्याने उन्हाळी बाजरीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. मावळ पूर्व पट्ट्यात सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रात बाजरी पीक घेतले जात आहे.
इंद्रायणी कृषी सेवा केंद्राचे संचालक गणेश दाभाडे म्हणाले,‘‘साधारण फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी होते. पर्ल ५१, सुजलाम ६८, महिको २२४०
व यु.एस.७७११ या वाणाचे बियाणांस जादा उत्पादन व खाण्यास चवदार असल्याने मागणी अधिक आहे. एकरी सुमारे तीन किलो बियाणे लागते.’’
इंदोरी ग्रामपंचायतीचे सदस्या सपना चव्हाण, आबासाहेब काशीद म्हणाले,‘‘
सध्या या पावसाळी वातावरणात बाजरी काढल्यास व पाऊस पडला; तर कणसे भिजून ओल्या मातीमुळे नुकसान होते. शिवाय वैरणीसाठी वापर होणारे बाजरी सरमाडचा पाला काळा पडून वाया जातो. त्यासाठी बाजरी काढणीनंतर कणसे
अळशीवरच दोन-तीन दिवस वाळली पाहिजेत. त्यानंतरच, कणसांची काठणी (कापणी) करून लगेच मळणी केली; तर पिकाचे नुकसान होत नाही.’’
सुदाम शेवकर, रमेश दिवसे म्हणाले,‘‘साधारणपणे एकरी १५ क्विंटल बाजरी उत्पादन मिळते आणि भाव ही क्विंटलला अडीच ते तीन हजार रुपये मिळतो. त्यामुळे, तीन महिन्यांत बाजरी पीक ही चांगले उत्पन्न मिळवून देते.’’

ssociated Media Ids : IDR24B02503

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com