कुंडमळा दुर्घटनेवेळी मदत करणाऱ्यांचा सन्मान
इंदोरी, ता. २३ : आपत्कालीन स्थितीत मदत करणाऱ्या दहा जणांना विशेष शौर्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सदू चव्हाण व बाळासाहेब सदू चव्हाण या बंधूंच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कुंडमळा दुर्घटनेवेळी बचाव कार्यात विशेष योगदान देणारे गौरव भेगडे, सागर भेगडे, संभाजी पवार, श्रीकांत भेगडे, भास्कर माळी, मुनार हरसुले, रामा पडवळ, संदीप ढोरे, दत्ता कवळे व संगपाल लबडे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच तळेगाव एमआयडीसी पोलिस आणि सुदुंबरे येथील एनडीआरएफ पथकाचाही गौरव करण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष भगवान शिंदे, उद्योजक संजय चव्हाण यांचे हस्ते पुरस्कार सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे संस्थापक विलासराव काळोखे होते. यावेळी यावेळी चैतन्य महाराज वाडेकर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला सुरेश दाभाडे, संजय मेहता, संतोष मोईकर, अतुल पवार, भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, विठ्ठल शिंदे, कृषी बाजार समिती संचालक दिलीप ढोरे, प्रशांत भागवत व अंकुश ढोरे, जनार्दन भेगडे, संदीप नाटक, रंगनाथ चव्हाण, दशरथ ढोरे उपस्थित होते.
PNE25V33735
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.