सुदुंबरे - सुदवडी पुलावर लोखंडी गज नसल्याने धोका
इंदोरी, ता. १० ः सुदवडी व सुदुंबरे गावांना जोडणाऱ्या सुधा नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी गज गेल्या पाच-सहा वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे नागरिकांना धोका पत्करून पुलावरून जाणे भाग पडते.
प्रशासनाने दुर्घटनेची वाट न पाहता संरक्षक गज तातडीने बसवावेत अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे. हे गज एकापाठोपाठ गायब झाले आहेत. याबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी वृत्त देऊन प्रश्नाला वाचा फोडली आहे.
सुदुंबरेकडील बाजूला रस्त्याचा तीव्र उतार, तर सुदवडीकडीला तीव्र वळण अशी पुलाची रचना मुळातच अपघाताला निमंत्रण देणारी आहे. याशिवाय पुलावर पथदिवे नाहीत. लगतच्या रस्त्यावर तसेच पुलावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने नदीपात्रात कोसळून अपघाताची शक्यता वाढली आहे.
शिंदे वासुली भागातील चाकण एमआयडीसीकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने येथील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय सुदुंबरे येथील सिद्धांत महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी व राष्ट्रीय आपत्कालीन दलाचे (एनडीआरएफ) जवान यांच्यासह शेकडो ग्रामस्थ याच मार्गाचा वापर करतात.
---
सुदुंबरे व सुदवडी या दोन्ही ग्रामपंचायतींनी धोकादायक पुलाची गांभिर्याने दखल घ्यावी. दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा.
- दिलीप डोळस, सामाजिक कार्यकर्ते
---
पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरु होत आहे. हे काम ठेकेदाराकडे सोपविले आहे. सध्या तात्पुरता उपाय म्हणून बांबूच्या काठ्या लावण्यात आल्या आहेत.
बापूसाहेब बोरकर, उपसरपंच, सुदुंबरे
----------------------------------------
फोटो
38881
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.