पिंपरी-चिंचवड
इंदोरी नाणोली रस्त्यावरील धोकादायक खड्डा
इंदोरी, ता. २३ ः इंदोरी-नाणोली रस्त्यावर बनजाई देवी मंदिराजवळ धोकादायक खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. येथे जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. पण, त्यानंतर चर पूर्णपणे बुजवला गेला नाही. तेथे आता मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात होत आहे. या रस्त्यावरून एमआयडीसी आंबीकडे अवजड वाहने तसेच शेतकरी, विद्यार्थी, कामगार मोठ्या प्रमाणात जा-ये करतात. तेथे दुर्घटना घडू शकते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
PNE25V42449
इंदोरी-नाणोली रस्ता ः पाइप लाइनच्या खोदकामामुळे पडलेला धोकादायक खड्डा.