एकाचवेळी तब्बल तीन हजार शिवलिंगांचे दर्शन
प्रकाश बैसाणे ः सकाळ वृत्तसेवा
जाधववाडी, ता.३१ ः जाधववाडी येथील प्रसिद्ध कैलास मान सरोवर मंदिरात महादेवाची तब्बल ३ हजार २०१ गुप्त शिवलिंगे आहेत. श्रावण महिन्यात मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
सुरुवातीला मंदिरात एक हजार एकशे अकरा शिवलिंगे होती. मात्र त्यामध्ये अजून वाढ करण्यात आली. आता तीन हजार दोनशे एक शिवलिंगे आहेत. मंदिराच्या मुख्यद्वारावर भगवान शिवशंकराची तब्बल ३२ फूट उंच पिंड आहे. मंदिराच्यासमोर नंदी आणि शिवलिंगाची भव्य मूर्ती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर कळस नसून भगवान शिवशंकराची पिंड आहे.
या मंदिरासमोरच नवग्रह मंदिर आहे. तसेच हनुमान मंदिर असून तेथेही हनुमानाच्या १०८ मूर्ती स्थापित केल्या आहेत. या मंदिराच्या आतमध्ये हिंदू धर्मातील अनेक देवीदेवतांचे मंदिरे आहेत. या शिवाय मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली आहे. गणपती मंदिर, स्वामी समर्थ, दत्त मंदिर, लक्ष्मी मंदिर, वैष्णो देवी अशा अनेक हिंदू देवादेवतांची मंदिरे आतमध्ये आहेत.
घर बनविणे थांबवले...
या मंदिराचे संस्थापक पुजारी साई बाबा म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांना सगळे भाविक साई बाबा म्हणून ओळखतात. ज्या ठिकाणी मंदिर उभारले आहे. साई बाबांना घर बांधायचे होते. मात्र, खोदकाम करत असताना तेथे एक शिवलिंग सापडले. येथे मंदिर व्हावे, अशी भगवान ईश्वराची इच्छा असल्याचे त्यांना जाणवले. ही ईश्वर आज्ञा आहे, असे मानून साई बाबा यांनी घर बनविणे थांबवून तेथे शिव मंदिर बांधले. तसेच तेथे हजारो शिवलिंगाची स्थापना केली. त्यांची संख्या पाच हजारांपर्यंत वाढवण्याचा साई बाबा यांचा मानस आहे.
मंदिराचे पुजारी साई बाबा सांगतात की, हिंदू धर्मातील सर्व देवींची एका ठिकाणी स्थापना करून एक शक्तिपीठ बनविण्याचा मानस आहे. मंदिर बनवण्याची प्रेरणा मला ईश्वरच देतो. त्यामुळे मी फक्त ईश्वराच्या आदेशाचे पालन करतो. येथील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मनःशांती मिळते.
- साई बाबा, पुजारी, कैलास मान सरोवर मंदिर, जाधववाडी
JDW25A00234
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.