शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास जीवघेणा

शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास जीवघेणा

Published on

जाधववाडी, ता.१५ ः जाधववाडी परिसरात महापालिकेची शाळा असून तेथील शालेय विद्यार्थ्यांची रिक्षांमधून अवैधपणे निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक आणि असुरक्षित वाहतूक होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. रिक्षाचालक नियमांची पर्वा न करता विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची घुसमट होत असून अपघाताचीही शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे.
दररोज सकाळी शाळा सुरू होण्याच्या आणि दुपारी शाळा संपल्याच्या वेळेस हा प्रकार जास्त प्रमाणात आढळून येतो. रिक्षाचालक हे नियम उल्लंघन करत रस्त्यावर रिक्षा थांबून विद्यार्थ्यांना चढवत असतात. शाळेत ये-जाण्यासाठी दुसरा सुरक्षित पर्याय उपलब्ध नाही. अनेक विद्यार्थी दररोज असुरक्षितपणे रिक्षामध्ये बसून येत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कसा ? आणि कोण सोडवणार ? असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील रिक्षा संघटनांही नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची पाठराखण करताना दिसतात.

पालकांचा गैरफायदा
जे पालक कामामुळे मुलांना शाळेत सोडू शकत नाहीत. त्यांना रिक्षा आणि खासगी वाहनांशिवाय शिवाय पर्याय नाही. त्याचाच गैरफायदा रिक्षाचालक घेत असल्याचे दिसत आहे. रिक्षाचालक आपल्या रिक्षामध्ये मुलांना अक्षरशः कोंबून भरत असल्याचे दिसून येत आहे.

नियमांचे उल्लंघन
- रिक्षात तीन प्रवासी बसविण्याचा नियम, मात्र दहा ते बारा विद्यार्थी
- विद्यार्थ्यांची दप्तरे चुकीच्या पद्धतीने रिक्षात टांगलेली
- चालकाच्या डाव्या बाजूला दोन आणि उजव्या बाजूला दोन असे चार विद्यार्थी पुढे असतात
- मागील बाजूस मधल्या भागात फळी बनवून त्यावर चार विद्यार्थी आणि मुख्य आसनावर पाच विद्यार्थी
- रिक्षात कोणतेही सुरक्षा उपकरण किंवा प्रथमोपचाराची पेटी नसते
- रिक्षाचालकांच्या भरवशावर विद्यार्थ्यांची सुरक्षा अवलंबून


रिक्षांना आरटीओकडून प्रवासी किंवा विद्यार्थी वाहतूक करण्याचा परवाना दिला जातो. काही रिक्षाचालक नियमांपेक्षा जात प्रवासी किंवा विद्यार्थी वाहतूक करत असतील; तर त्यावर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येईल. फक्त पिवळ्या नंबर प्लेट असणाऱ्या रिक्षांनाच प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे.
- दत्ता चासकर, पोलिस निरीक्षक, तळवडे वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com