शिव रस्त्यावर मुरूमाची ‘मलमपट्टी’

शिव रस्त्यावर मुरूमाची ‘मलमपट्टी’

Published on

जाधववाडी, ता.५ ः विद्युत केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर डांबरीकरण न करता केवळ मुरूम टाकून खड्डा बुजविण्यात आल्याने जाधववाडी येथील शिव रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून वाहनचालक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांसाठी अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
महावितरण कंपनीच्यावतीने काही दिवसांपूर्वी शिव रस्त्यावर विद्युत केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार व विभागाची असताना प्रत्यक्षात मात्र केवळ मुरूम टाकून खड्डा तात्पुरता बुजविण्यात आला आहे. तेथे टाकलेला मुरूम सैल झाल्यामुळे दुचाकी वाहने घसरत आहेत, तर चारचाकी वाहनांना धक्के बसत असल्याने वाहनांचे नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. विशेषतः रात्रीच्यावेळी या ठिकाणी कोणतेही सूचना फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स किंवा प्रकाश व्यवस्था नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. सकाळ- संध्याकाळ वाहतुकीची वर्दळ अधिक असते. मात्र अशा परिस्थितीत रस्त्यावरील अर्धवट बुजवलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी दुचाकी घसरून किरकोळ अपघातही घडल्याची माहिती असून, मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्यावर टाकलेल्या मुरुमामुळे अनेक वेळा येथे दुचाकी घसरतात आणि अपघात होत आहेत. संबंधित विभागाने तत्काळ या ठिकाणी कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करावी. योग्य सूचना फलक व बॅरिकेड्स लावावेत. तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी
- प्रशांत अहिरे, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com