

कामशेत, ता.२८ : कामशेत भागात मागील काही दिवसांपासून ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून वाहतूक केली जात आहे. उसाने भरलेल्या दोन ट्रॉली एकाच ट्रॅक्टरला जोडून ऊस वाहतूक केली जात आहे. त्यामुळे, अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतुकीच्या सर्व नियमांची पायमल्ली करुन बेकायदेशीररित्या धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टरचालकांवर कारवाई होणार का ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
ऊस वाहतूक करणाऱ्या जवळपास सर्वच ट्रॅक्टर्सना दोन ट्रॉलीज जोडलेल्या असल्याने तेथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही ट्रॅक्टरचालकांना अशा दोन ट्रॉल्या एकाच वेळी जोडल्याने चढ असलेल्या ठिकाणी चालकाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. उसाच्या ट्रॅक्टर्सचे चढ असलेल्या ठिकाणी पुढची चाकेवर जाऊन ट्रॅक्टर फक्त मागच्या दोन चाकावर पुढे नेला जातो. त्यामुळे, येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशा ट्रॅक्टरचालकांकडून होणाऱ्या निष्काळजीपणाला जबाबदार कोण ? असाही प्रश्न यानिमित्ताने समोर येतो.
ओव्हरटेक करण्याचा प्रश्न येतो. तेव्हा, दुचाकीचालकांना आपला जीव मुठीत ठेऊन गाडी पुढे न्यावी लागते. काही वेळा चालकाच्या समोर मोठमोठ्या आवाजात स्पीकर्सवर गाणी सुरु असतात. त्यामुळे, काही वेळेला हॉर्न दिल्यानंतर सुद्धा या चालकांपर्यंत आवाज पोहचणे कठीण होऊन बसते. त्यामुळे, ओव्हरटेक करताना अडचणी येतात.
नाणे मावळमधून येताना रेल्वेच्या गेट क्र. ४३ वरून वळण घेताना ट्रॅक्टरचालक आणि दुचाकीचालक यांच्यामध्ये कधी कधी वादावादीचे प्रसंग निर्माण होत असतात. त्यात कधी कधी सर्वात मागे असलेल्या ट्रॉलीमधील ऊस वाहनचालकांच्या वाहनावर पडण्याची दाट शक्यता असते.
मी मागील काही दिवसांपूर्वी नाणे मावळात संपूर्ण कुटुंबासमवेत फिरायला गेलो असता ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांचा वाईट अनुभव आला. मला या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करायचा होता. परंतु, स्पीकर्सवर जोरात गाणी चालू असल्याने त्याला माझ्या गाडीचा हॉर्न ऐकूच गेला नाही. त्यामुळे, मला गाडी ओव्हरटेक करताच आली नाही.
- जॉन फर्नांडिस, प्रवासी, कामशेत
कामशेत येथील गेट क्र. ४३ जवळ रेल्वे गेट बंद असताना हमखास येथे ट्रॅक्टरचालक व दुचाकीचालक ह्यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळते. त्यामुळे, वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण होतो.
- अमोल, नोकरदार, नाणे मावळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.