पंक्चरवाल्यांकडून केली जातेय 
वाहनचालकांची फसवणूक

पंक्चरवाल्यांकडून केली जातेय वाहनचालकांची फसवणूक

कामशेत, ता. २५ : पंक्चरवाल्यांकडून वाहनचालकांची लूट केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. या प्रकरणाची ‘ना दाद, ना फिर्याद’ अशी स्थिती झाली आहे.

अचानक वाहन पंक्चर झाल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याचाच फायदा काही पंक्चर दुकानदार घेत आहेत. काही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर वाहनचालक दुचाकी किंवा चारचाकीमध्ये हवा भरून घेत असतात. त्यावेळी पंक्चरवाल्यांकडून वाहनचालकांना सांगितले जाते की, तुमचे वाहन पंक्चर आहे. अचानक वाहन पंक्चर झाले कसे? अशी संभ्रमावस्था वाहनचालकांमध्ये निर्माण होत आहे. याचाच फायदा घेऊन वाहनचालकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जात आहेत. फसवणूक होत आहे हे वाहनचालकांच्या लक्षात येत असूनसुद्धा वाहनचालकांकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. पंक्चर दुकानदार किमान दोनशे ते तीनशे रुपये आकारत असतात.

‘‘पेट्रोल भरण्यासाठी एका पेट्रोलपंपावर थांबलो. पेट्रोल भरून झाल्यावर हवा भरण्यासाठी थांबलो तर समजलं की गाडी पंक्चर आहे. परंतु, सुमारे ३५ ते ४० किलोमीटर लांबून प्रवास करून आलो तरी गाडी पंक्चर झाली नाही, अचानक कशी पंक्चर झाली? अशी संभ्रमावस्था आहे. पंक्चर काढण्यासाठी जवळपास ४५० रुपये खर्च आला.
- अभय जवेरी, दुचाकीस्वार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com