
वाल्हेकरवाडीत शिवसेनेचा महिला मेळावा उत्साहात
किवळे, ता. ६ : वाल्हेकरवाडी येथील ज्योती भालके, संदीप भालके यांच्या पुढाकाराने चिंचवड काकडे पार्क येथे आनंदीबाई डोके सभागृहात झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
शिवसेना महिला आघाडीप्रमुख व उपनेत्या मीना कांबळी, माजी महापौर विशाखा राऊत, लतिका पास्टे यांनी मार्गदर्शन केले. कांबळी यांच्या मार्गदर्शनामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. शहर शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यास माजी नगरसेविका मीनल यादव, रेखा दर्शिले आदी उपस्थित होते. शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी मार्गदर्शन केले. स्वागत वैशाली मराठे यांनी केले. मेळाव्यात मनसेच्या भोसरी विधानसभेच्या महिला अध्यक्षा काटे व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. वैशालीताई मराठे, अनिता तुतारे, ज्योती भालके यांनी नियोजन केले.
फोटोः 02054