Sun, March 26, 2023

एंजल्स मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
एंजल्स मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
Published on : 28 January 2023, 9:38 am
किवळे, ता. २८ : नवग्रह शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, एंजल्स पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नाटक, नृत्य, कराटे, लाठी-काठी, मल्लखांब, शिवाजी महाराज राज्याभिषेक सादर केले. यावेळी माजी नगरसेवक राहुल कलाटे, सदाशिव तरस, नवनाथ तरस, मच्छिंद्र तरस, संतोष तरस, मुख्याध्यापिका शुभांगी तरस, भाग्यश्री तरस, अश्विनी तरस, नाना टिळे, किरण काटे, नितीन जैद, हनुमंत आरुडे, तसेच शिक्षक आणि पालक उपस्थित होते.