फुलजाई देवी मंदिर परिसरात ‘महावितरण’चे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलजाई देवी मंदिर परिसरात 
‘महावितरण’चे दुर्लक्ष
फुलजाई देवी मंदिर परिसरात ‘महावितरण’चे दुर्लक्ष

फुलजाई देवी मंदिर परिसरात ‘महावितरण’चे दुर्लक्ष

sakal_logo
By

किवळे, ता. २८ : रावेत शिंदेवस्ती येथील सर्व्हे नंबर १३० मधील फुलजाई देवी मंदिर परिसरातील अनेक डीपी उघड्या अवस्थेत असून, परिसरात लहान मुले खेळत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
या बाबत ‘महावितरण’च्या रावेत शाखेत तक्रार करूनही वायरमन दखल घेत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. वीजवाहक ताराही अस्ताव्यस्त पडल्या असून, या ठिकाणी ‘महावितरण’कडून लवकरात लवकर उपाययोजना होण्याची गरज आहे, अशी मागणी सौरभ भोंडवे यांनी केली आहे.

kiw27001p1,p2 :