Water shortage
Water shortagesakal

Pune : टॅंकरची प्रतिक्षा सकाळी, हेच आमच्या भाळी

कोटेश्‍वरवाडीतील महिलांची खंत, पाणी योजना सुरू करण्याची मागणी
Published on

देहूरोड : कॅन्टोन्मेंट हद्दीतील वॉर्ड क्रमांक एकमधील कोटेश्वरवाडी येथे वर्षानुवर्षे टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. बंद पाणी योजना त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कॅन्टोन्मेंटच्या देहूरोड येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेपासून आठ किलोमीटरवर असलेल्या कोटेश्वरवाडीत वापरण्यासाठी कूपनलिकांचा अपवाद सोडल्यास कॅन्टोन्मेंटकडून पिण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टँकरची प्रतिक्षा करणे, टँकर आल्यानंतर धावाधाव करत चौकापर्यंत जाणे, एकापेक्षा अनेक हांडे डोक्यावर घेऊन येणे असा हा आमचा त्रास कधी संपणार, असा सवाल कोटेश्वरवाडीतील मीनल दाभाडे, कल्पना दाभाडे, सुनीता दाभाडे, स्वाती दाभाडे, शीला दाभाडे, निर्मला दाभाडे, नीलम दाभाडे, धनश्री दाभाडे, प्रियांका दाभाडे, सोनाली दाभाडे यांनी उपस्थित केला आहे.

Water shortage
Water Wastage : जलकुंभाचे मुख्य वाहिनी लिकेज; मनपाचे समस्येकडे दुर्लक्ष

कॅन्टोन्मेंटचे तत्कालीन उपाध्यक्ष अशोक शेलार यांच्या कार्यकाळात सुमारे २० लाख रुपये खर्च करून, इंद्रायणी नदीकाठी पाणी योजना तयार करण्यात आली. मात्र, हे पाणी अपेक्षित फिल्टर नसल्याने नागरिकांनी नळजोड घेतले नाहीत. त्यामुळे आजपर्यंत ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही.

दरम्यान, कॅन्टोन्मेंट पातळीवर योजना कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे शेलार यांनी सांगितले तर अजून एका छोट्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी आमची जागा उपलब्ध करून देऊन, आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्याचे सामूहिक प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष काशिनाथ दाभाडे व ग्रामस्थ नितीन दाभाडे यांनी दिली.

Water shortage
Clean River, Save Water : नदी स्वच्छता, पाणी वाचवाचा संदेश देत नाशिकचे सुभाष जांगडा धावले नाशिक ते त्र्यंबकेश्वर!

टँकरच्या फेऱ्यांमध्ये घट

यापूर्वी टँकरच्या दिवसाआड फेऱ्या होत होत्या. तेव्हा पिण्याच्या दृष्टीने मुबलक पाणी मिळत होते. मात्र, अलीकडे टँकर फेऱ्यांमध्ये घट झाली असून, त्यात वाढ करावी, अशी मागणी महिलांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.