दिपेशने लष्करातील जेई अर्किटेक्ट पदावर मारली मजल

दिपेशने लष्करातील जेई अर्किटेक्ट पदावर मारली मजल

Published on

देहूरोड, ता. १८ : ‘आईच्या आशीर्वादरूपी पाठबळामुळे लष्कराचे अर्किटेक्ट जेई पद मिळवण्यात यश आले.’
हे वाक्य आहे नवनिर्वाचित आर्किटेक्ट जी ई दिपेश दिलीप घोसाळकर यांचे ज्याने आपल्या मेहनत आणि निश्‍चयाच्या बळावर या अर्किटेक्ट जेई पदापर्यंत मजल मारली आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील दिपेश घोसाळकर (वय ३०) यांनी दापोडी येथील सीएमई कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये आर्किटेक्ट जेईचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला.

लष्करात काम करण्याचा महत्त्वकांक्षा ः
दीपेशचे मूळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बोरज. वडील दिलीप घोसाळकर लष्करात हवालदार या पदावर कार्यरत होते. लष्करी सेवेत वडिलांनी सतरा वर्ष हवालदार पदावर सेवा केली. नंतर त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वडिलांमुळे आपणही लष्करी सेवेत असावे ही दिपेशची महत्त्वकांशा होती. दीपेश सध्या देहूरोड येथे निवासस्थानी असून सुटी संपल्यानंतर २१ तारखेला ते श्रीनगर येथील मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेस विभागात पदाची सूत्रे स्वीकारणार आहे.

शैक्षणिक वाटचाल ः
दीपेश घोसाळकर यांनी २०१२ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. देहूरोड येथील सेंडज्यूड शाळेत पाचवी ते दहावी तर पदवीचे शिक्षण वाकड येथील इंदिरा महाविद्यालयात पूर्ण केले. आर्किटेक्ट जेईच्या प्रवासात सुरुवातीस खडकी येथील बॉम्बे सॅपर्स मध्ये टीबी १ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत प्राथमिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले. २०२३ मध्ये त्यांनी सीएमई सैनिकी मिलिटरी महाविद्यालयात जेईचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

आईकडून आर्थिक पाठबळ :
पती दिलीप घोसाळकर यांच्या निधनानंतर पत्नी दीपाली खचून न जाता. दीपाली या अनुकंपा तत्त्वावर कॅन्टोन्मेंटमध्ये रुजू झाल्या. व त्यांनी घरातील आर्थिक गरजा पूर्ण केल्या. व मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे एक चांगले आर्थिक पाठबळ दीपेश यांना मिळाले. दीपेश यांना तीन विवाहित बहिणी आहेत.


‘‘ देहूरोड येथून बॉम्बे सॅपर्स मधील भरती प्रक्रियेस जाण्यासाठी आम्ही दोघे दुचाकीवर निघालो होतो. मात्र, गाडी रस्त्यात बंद पडली आणि खोळंबा झाला. मग दीपेश लिफ्ट घेऊन भरतीच्या ठिकाणी पोहोचला आणि मी मागून रिक्षाने गेले, निसर्गाकडून अशी आम्हाला मदत झाली. ’’
- दीपाली घोसाळकर, आई

‘‘ लष्करी सेवेची खरी प्रेरणा मिळाली ती माझ्या आईकडूनच. एकेकाळी स्वतः उपाशी राहून आम्हा चार भावंडांचे तिने पोट भरले. लष्करात अजून मोठ्या पदावर पदोन्नती मिळवायची महत्त्वकांक्षा आहे. माझ्या यशाचे सर्व श्रेय आईला जाते. ’’
- दीपेश घोसाळकर, नवनिर्वाचित आर्किटेक्ट जी ई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.