जांबे-नेरे, सांगवडे रस्त्यांच्या दुरुस्तीमध्ये पावसाचा अडथळा

जांबे-नेरे, सांगवडे रस्त्यांच्या दुरुस्तीमध्ये पावसाचा अडथळा

Published on

किवळे, ता. २८ : जांबे ते नेरे आणि जांबे ते सांगवडे या दोन्ही गावांदरम्यान रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. सध्या जांबे ग्रामपंचायतीमार्फत खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले तरी मुसळधार पावसामुळे टाकलेली खडी तग धरत नाही. वाहन चालकांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरी कायमस्वरूपी उपायांची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जांबे परिसरात १५ आरएमसी प्लॅन्ट असून त्यातून होणाऱ्या जडवाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून अंदाजे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुनावळे-जांबे-नेरे असा सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता असून ग्रामपंचायतीमार्फत आतापर्यंत तीन वेळा खडीकरण करण्यात आले. मात्र, पाऊस आणि जड वाहनांच्या रहदारीमुळे रस्ता पुन्हा खराब होत आहे. रोडरोलरच्या साहाय्याने सध्या खड्डे बुजविले जात आहेत, अशी माहिती वैभव शितोळे, प्रवीण शितोळे यांनी दिली.

नोकरीनिमित्त सांगवडेहून हिंजवडीला रोज याच मार्गाने जावे लागते. खडतर रस्ता सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती व्हावी. जांबे-सांगवडे मार्गावर पथदिवे नसल्याने रात्री गैरसोय होते. सांगवडे ग्रामपंचायतीने याची दखल घ्यावी.
- सुजाता शेटे, टेराग्रीन सोसायटी, सांगवडे
KIW25B04800

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com