विविध मागण्यांसाठी किन्हईमध्ये लाक्षणिक उपोषण
देहूरोड, ता. ३१ : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून देहूरोडला नगर परिषद घोषित करण्याच्या मागणीसह इतर स्थानिक मुद्द्यांसाठी किन्हई गाव ग्रामविकास मंडळाच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
बबन पिंजण यांच्या नेतृत्वाखाली हनुमान मंदिराच्या सभामंडपात हे आंदोलन झाले. उपाध्यक्ष सचिन पिंजण, नितीन पिंजण, सागर पिंजण, शरद जगताप, नीलेश शेंडगे, या उपोषणाला सर्वपक्षीय संजय पिंजण, अमोल पिंजण, ज्योती पिंजण, सविता पिंजण, धर्मपाल तंतरपाळे, अरुण जगताप, कृष्णा दाभोळे आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅम्युनिशन डेपोमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्यावा, श्री क्षेत्र देहू ते देहूरोड पालखी मार्गाचे त्वरीत चौपदरीकरण करावे, घर बांधणी व दुरुस्तीसाठी त्वरीत परवानग्या द्याव्यात, ब्रिटिश काळात बळकावलेल्या जमिनींचा १२.५ टक्के परतावा द्यावा, भूमिहीन शेतकऱ्यांना प्रमाणपत्र द्यावे, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ स्थानिक जनतेला मिळावा, रेडझोनची मर्यादा डेपोच्या सीमाभिंतीपर्यंत ठेवावी, भूमिहीन शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत प्राधान्य द्यावे आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत; तर तीव्र आंदोलन करण्यात येतील, असा इशारा ग्रामविकास मंडळाने दिला आहे.
KIW25B04806
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.