देहूरोड परिसरात ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू
देहूरोड, ता. १० : ‘‘चला, आपण सर्वांत मोठ्या देशव्यापी जनभागीदारी आंदोलनाचे अभिमानी स्वयंसेवक बनूया,’’ अशा आवाहनासह ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट प्रशासनामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.
देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे, स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांची आठवण करून देणे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचवणे हे या उपक्रमाचे उद्देश आहेत. नागरिकांनी आपल्या कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि शेजाऱ्यांसह या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाने केले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नागरिकांनी तिरंगा ध्वजासह सेल्फी काढून https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.