किवळेतील आठवडे बाजाराने ‘डोक्याची मंडई’

किवळेतील आठवडे बाजाराने ‘डोक्याची मंडई’

Published on

किवळे, ता.४ : प्रभाग १६ अंतर्गत येणाऱ्या किवळे येथील के-व्हिले इमारतीसमोरील मोकळ्या खासगी जागेत दर आठवड्याला भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडून जात आहे. तसेच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
मुकाई चौक ते निगडी भक्ती-शक्ती चौक या अत्यंत महत्त्वाच्या बीआरटी मार्गावर केव्हिले परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. आठवडे बाजारात खरेदीसाठी येणारे नागरिक आपली दुचाकी व चारचाकी वाहने थेट मुख्य रस्त्यावर तसेच बीआरटी मार्गालगत उभी करत असल्याने रस्त्याची रुंदी कमी होत आहे. परिणामी, बीआरटी बस, खासगी वाहने आणि दुचाकी यांची सरमिसळ होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
जोपर्यंत ठोस नियोजन, अधिकृत परवानगी आणि स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत हा आठवडे बाजार तत्काळ बंद करण्यात यावा, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या अपघातास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात रावेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामनाथ फटांगडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


काय आहेत तक्रारी ?
- कोणतेही वाहतूक नियोजन किंवा स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था नाही
- नियमांना धाब्यावर बसवून रस्ते अडविले जातात
- शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिका यांना देखील अडचणींचा सामना

मागण्या काय ?
- वाहतूक पोलिस शाखेने तातडीने दखल घ्यावी
- कोंडीस जबाबदार असलेल्या आठवडे बाजार चालकांवर कठोर कारवाई करावी
- रस्त्यावर बेकायदेशीररीत्या वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी

के-व्हिले परिसर देहूरोड की रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो, याबाबत माहिती घेतली जाईल. त्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
- विशाल गजरमल, पोलिस निरीक्षक, देहूरोड वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com