
कामशेतमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा खून
कामशेत, ता. ९ ः कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी (ता. ८) रात्री दहाच्या सुमारास कामशेतमध्ये घडली.
मयूरी दशरथ शिंदे (वय ३८, रा. कामशेत, ता. मावळ) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती दशरथ विठ्ठल शिंदे (वय ४३, रा. कामशेत, ता. मावळ) यास अटक करण्यात आली असून, त्याच्यावर कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत येथे आरोपी दशरथ शिंदे याने आपल्या घरी झालेल्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरून पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या घडलेल्या या घटनेत मयूरी शिंदे हिचा मृत्यू झाला. गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
दरम्यान, घटनास्थळी लोणावळा विभाग सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार, शुभम चव्हाण यांनी भेट दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार हे करीत आहेत.