गोल्डन ग्लेड्समध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोल्डन ग्लेड्समध्ये 
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
गोल्डन ग्लेड्समध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

गोल्डन ग्लेड्समध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

कामशेत, ता. ३० ः करंजगाव येथील गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्‍घाटन संस्थेचे सचिव विजय टाकवे यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे सुलाभ राळे, दीपक गालफाडे यांनी केले. विद्यालयातील भक्ती कुटे व राजेश शेलार यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक बापूराव नवले, केंद्र प्रमुख सीताराम घोडके, संभाजी कुटे, बापू गरुड, गुलाब कोंढरे, दिनेश ठाकर, विनायक पोटफोडे, दिनकर सातकर आदी मान्यवर उपस्थित होते. अनिल सातकर व अशोक वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर विजय केदारी यांनी आभार मानले.

कामशेत ः विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना मान्यवर.