कामशेतमध्ये बैलपोळानिमित्त कारागिरांची लगबग

कामशेतमध्ये बैलपोळानिमित्त कारागिरांची लगबग

कामशेत, ता. १३ ः बैलपोळानिमित्ताने ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू असतानाच कारागिरांची लगबगही सुरू आहे. बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने व लंपीचा प्रादुर्भाव नसल्याने यावर्षीचा बैलपोळा सर्वच ठिकाणी धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचे गाडामालकांकडून सांगण्यात येत आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये घोड्याचा वापर होत असल्याने मातीच्या बैलजोडी बरोबरच मातीची घोडी विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्सवानंतर लगेचच बैलपोळा येतोय त्यानंतर दुसऱ्या‍च दिवशी घटस्थापना करण्यासाठी मातीच्या घटाची मागणी पुरविताना कारागिरांची दमछाक होत आहे. त्यामुळे कारागिरांची लगबग आणखीनच वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com