लोणावळ्यात जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थानच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यात जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थानच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाला प्रारंभ
लोणावळ्यात जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थानच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाला प्रारंभ

लोणावळ्यात जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थानच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाला प्रारंभ

sakal_logo
By

लोणावळ्यात विविध कार्यक्रमांना प्रारंभ
जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थानच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाला प्रारंभ

लोणावळा, ता. २०: येथील श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थान ट्रस्ट व श्री शांतीनाथ जैन संघ यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळ्यात जैन मुनी श्री विजय अक्षय बोधिसूरीश्वरजी महाराज यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. नऊ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात रोज विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रवचने, महाआरती, पूजा पाठ तसेच अन्नदान, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थान ट्रस्ट व श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघ स्थानकास सव्वाशे वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने
वाद्यांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने जैन धर्मीय पुरुष, युवक व महिला आणि युवतींना पारंपरिक वेशभूषा धारण करत सहभागी झाले होते. लोणावळा गावठाणातील खोंडगेवाडी येथे भव्य हस्तिनापूरनगरी उभारण्यात आली असून, भरत चक्रवर्ती भव्य भोजन कक्ष, सभामंडप, सांस्कृतिक व धार्मिक कक्षही उभारण्यात आला. परम पूज्य आचार्य श्री विजय अक्षय बोधिसूरीश्वर जी महाराज यांच्या आशीर्वादाने नऊ दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रवचने आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी आचार्य श्री विजय रत्न सेनसुरीश्वर जी महाराजा, परम पूज्य साध्वी श्री दिव्यप्रभाश्री जी महाराज साहेब यांची प्रवचने होणार आहेत.
रौप्यमहोत्सवानिमित्त जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थान ट्रस्ट व श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघ यांच्यावतीने लोणावळा गावठाणातील श्री भैरवनाथ मंदिर, श्री हनुमान मंदिर (खोंडगेवाडी), श्री लक्ष्मीआई मंदिर, श्री शितळादेवी मंदिर तसेच बुद्धविहार यांना देणगी देण्यात येणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासह बुधवारी (ता. २५) आयोजित करण्यात आलेल्या रथ यात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थान ट्रस्ट व श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघाचे विश्वस्त प्रकाशराज चौहान, प्रकाशचंद परमार, मांगीलाल जैन, महेंद्र ओसवाल, गिरीश शहा, प्रदिप पत्रावाला, नितीन शहा, संदीप शहा, सुरेश भंडारी, ललित ओसवाल, गिरीश मुथा यांनी केले आहे.

छायाचित्रे: LON23B02284/02285

लोणावळा ः श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थान ट्रस्ट व श्री शांतीनाथ जैन संघ यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जैन बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.