Tue, Jan 31, 2023

रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
Published on : 22 January 2023, 10:27 am
लोणावळा, ता. २२ : बोरघाटात खंडाळा ते मंकीहील दरम्यान धावत्या रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा शनिवारी (ता. २१) मृत्यू झाला. मृत इसमाचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष असून उंची पाच फूट आठ इंच आहे. रंगाने गहुवर्ण, चेहरा उभट, बांधा किरकोळ, दाढी व डोक्याचे केस पांढरे वाढलेले, कपाळ मोठे असे मृताचे वर्णन असून मृताच्या अंगात काळ्या रंगाचा पूर्ण बाह्याचा स्वेटर व नेसणीस चॉकलेटी रंगाची हाफ बर्म्युडा पॅंट परिधान करण्यात आली आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून मृताविषयी माहिती असल्यास लोणावळा रेल्वे दूरक्षेत्राचे पोलिस अंमलदार ए. डी. जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.