द्रुतगतीवर साडेदहा लाखांचा अवैध गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रुतगतीवर साडेदहा लाखांचा अवैध गुटखा जप्त
द्रुतगतीवर साडेदहा लाखांचा अवैध गुटखा जप्त

द्रुतगतीवर साडेदहा लाखांचा अवैध गुटखा जप्त

sakal_logo
By

द्रुतगती मार्गावर
अवैध गुटखा जप्त

लोणावळा, ता. ६ ः पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत, ३४२ पोती अवैध गुटखा व वाहतूक करणारा ट्रक असा एकूण २५ लाख ६७ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
लोणावळ्याजवळ सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व पुणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात ट्रकचालक महम्मद खलिल जमाल अहमद शेख (वय-४०, रा. लालगीरी, कर्नाटक), ट्रक क्लीनर नसरुद्दीन बुऱ्हाणसाब खडखडे (वय-३५, रा. कर्नाटक) व ट्रकमालक सद्दाम ऊर्फ सय्यद गुडुसाहब मुल्ला दस्तगीर (रा. मुल्ला गल्ली, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.