खंडाळ्यात द्रुतगती मार्गावर मोटार जळून खाक

खंडाळ्यात द्रुतगती मार्गावर मोटार जळून खाक

Published on

खंडाळा बोगद्याजवळ
मोटार जळून खाक

लोणावळा, ता. ९ ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ अचानक आग लागल्याने मोटार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मोटारीच्या (एमएच १२ सीपी २४८६) इंजिनातून अचानक धूर निघू लागला. मोटारीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पडत मोटार मार्गालगत उभी केली. घटनेची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे फौजदार सिध्दार्थ गायकवाड, खंडाळा घाट महामार्गाचे पोलिस कर्मचारी, देवदूत यंत्रणा व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन बंबाच्या साह्याने आग शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीत संपूर्ण मोटार जळून खाक झाली होती. यादरम्यान पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.