
शिवदुर्गतर्फे विद्यार्थ्यांना ‘आर्टिफिशियल वॉल क्लायबिंग’ चे धडे
लोणावळा, ता. २१ : व्हिपीएस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिवदुर्ग मित्र संस्थेच्या वतीने साहसाचे धडे देण्यात आले. प्राचार्या अंजनी गाणू यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘आर्टिफिशियल वॉल क्लायबिंग’ हा खेळ ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ‘आर्टिफिशियल वॉल क्लायबिंग’ खेळाची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. शिवदुर्गच्या रेस्क्यू विषयीची फिल्म यावेळी दाखवण्यात आली. शिवदुर्गचे क्लायबिंग, रेस्क्यू, ॲनिमल, सायकलींग, फिटनेस, सांस्कृतिक आदी विभागातील कार्याची स्लाईड शोच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.
विद्यार्थिनी तन्वी आहेर हिने रॅपलींग तर ओम हरसुले, आयुष वर्तक यांनी हायलाईनचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. वेटलिफ्टींग पॉवरलिफ्टिंग, सायकलींग या खेळातही विद्यार्थ्यांना संधी आहेत. करिअर करण्यासाठी हा एक पर्याय असू शकतो. मोबाईलपेक्षा मुलांनी मैदानी खेळांकडे लक्ष दिले पाहिजे, विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांची शक्ती योग्य दिशेने लागली तर शाळेचे नाव व लोणावळ्याचे नाव विद्यार्थी उज्जवलित करतील असे मत शिवदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शिवदुर्गचे उपाध्यक्ष महेश मसने, सचिव सुनिल गायकवाड, आनंद गावडे, अनिल सुतार, जेष्ठ गिर्यारोहक सचिन गायकवाड, समिर जोशी, ओंकार पडवळ, ओम हरसुले, आयुष वर्तक, आदित्य पिलाने, हर्ष तोंडे, सिध्देश निसाळ, दुर्वेश साठे, अजय शेलार, निकेत म्हाळसकर, यश सोनावणे या सदस्यांनी प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. प्राचार्या अंजनी गाणू यांनी प्रास्ताविक केले.