लोणावळ्यात यंदाच्या वर्षी १ हजार ४३० बारावीचे परिक्षार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यात यंदाच्या वर्षी 
१ हजार ४३० बारावीचे परिक्षार्थी
लोणावळ्यात यंदाच्या वर्षी १ हजार ४३० बारावीचे परिक्षार्थी

लोणावळ्यात यंदाच्या वर्षी १ हजार ४३० बारावीचे परिक्षार्थी

sakal_logo
By

लोणावळा, ता. २१ : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेस लोणावळ्यात उत्साहात सुरवात झाली. लोणावळा अंतर्गत एकूण १ हजार ४३० विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देत असल्याची माहिती केंद्र प्रमुख प्राचार्य आदिनाथ दहिफळे यांनी दिली. व्हीपीएस हायस्कूल १ हजार १०३, उपकेंद्र असलेल्या तुंगार्ली येथील डॉन बास्को हायस्कूलमध्ये ३२८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेत सर्वाधिक ९७५, विज्ञान शाखेत ३६९, कला शाखेत ८६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती प्राचार्या अंजनी गाणू व केंद्रप्रमुख दहिफळे यांनी दिली. परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध संघटनांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.