
लोणावळा नगर परिषदेतर्फे दिव्यांगांना महिन्याला अडीच हजार
लोणावळा, ता. १८ ः लोणावळा नगर परिषदेच्या वतीने हद्दीतील दिव्यांगासाठी वार्षिक उदरनिर्वाह भत्त्यात वाढ करत ती ३० हजार करण्यात आहे. मासिक भत्ता दीड हजारांहून अडीच हजार करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या वतीने यापूर्वी दिव्यांगाना वार्षिक अठरा हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात येत होता. सदर भत्ता अपुरा असल्याने अठरा हजारांहून ३६ हजार रुपये करण्यात यावा अशी मागणी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी लोणावळा नगरपरिषदेकडे केली होती. त्यांच्या मागणीला यश मिळत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद हद्दीतील दिव्यांगासाठी वार्षिक ३० हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता लागू केला आहे. वाढती महागाई व औषधोपचार, दिव्यांगांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तो अपुरा होता, असे जाधव व पुजारी यांनी सांगितले. शासन निर्देशानुसार लोणावळा शहरातील दिव्यांग व्यक्तींना नगरपरिषदेच्या अंध अपंग समस्या योजनेच्या पाच टक्के राखील निधी दिव्यांग उदरनिर्वाह करता ठेवणे व त्याच वर्षी तो वाटप करणे असे नमूद आहे. मात्र जवळपास अडीच कोटीं रुपयांचा निधी अखर्चित निधी या शिर्षकाखाली शिल्लक होता पुजारी म्हणाले.