
रेल्वे सेवानिवृत्त पेन्शनधारकांची सुविधा देण्याची मागणी
लोणावळा, ता. २७ : रेल्वेच्या सेवानिवृत्त पेन्शनधारकांना सुविधा मिळाव्यात, अशी मागणी माजी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन पुणे मंडळ देहूरोड शाखेच्या वतीने देवळे येथे रिटायर्ड रेल्वे मेन्स युनियनची बैठक झाली. देहूरोड शाखेचे अध्यक्ष पन्नालाल सेन, सचिव भीमण्णा पंतगी, खजिनदार माणिक एकाड, उपाध्यक्ष एस. बी. जाधव, चंद्रकांत ठोंबरे, लोणावळा शहराध्यक्ष सच्चिदानंद बलराज, सचिव सुभाष गायकवाड, देवळेच्या सरपंच वंदना आंबेकर, उपसरपंच जयश्री गाडे, पोलिस पाटील राहुल आंबेकर, अनिल आंबेकर, बाळासाहेब आंबेकर, कान्हू आंबेकर आदी उपस्थित होते. या बैठकीत उम्मीद कार्ड, रेल्वे पास मिळावेत, पेन्शन पगार स्लीप, खासगी दवाखान्याची सुविधा, पेन्शनमध्ये मिळणारे दवाखान्याचे एक हजार रुपये आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. उपस्थित रेल्वेच्या माजी कर्मचाऱ्यांना पन्नालाल सेन, भीमण्णा पंतगी सच्चिदानंद बलराज, सुभाष गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. बबनराव आंबेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
छायाचित्र: LON23B02432